
मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे उजेड परिसरात नदीला महासागराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेक गावांचा संपर्क ही तुटलेला आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुसळधार पावसामुळे मांजरा नदीने रौद्र रूप धारण केले आहे . उजेड परिसरातील नदीचे दृश्य एखाद्या महासागराप्रमाणे दिसत आहे . पाण्याने प्रचंड वेग धारण केलेला आहे. नदीकाठी 700 ते 800 मीटर पर्यंत पाणी वाढ होत आहे . शेतातील पिकाच्या वरून चार ते पाच फूट पाणी आहे त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. पाणी पाहण्याकरता येणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.पोलीस प्रशासन नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यावर लक्ष ठेवून आहेत.