
भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले होते. या स्नेहभोजनाच्या पंगतीला मोक्कातील आरोपी व विधानसभा आवारात हाणामारी करणारा ऋषिकेश टकले हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी बसून भोजनाचा आस्वाद घेतानाचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कृष्णेचा पूर ओसरल्यानंतर सोपस्कार पार पाडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही नियोजित गावांचा दौरा केला. त्यात भिलवडी गावाचा समावेश होता. येथील पूरग्रस्तांच्या निवारा केंद्रात पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूरग्रस्तांबरोबर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जिह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पालकमंत्र्यांची मूक संमती आहे का? असा सवाल केला जात आहे.