अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलला रामराम केल्यानंतर हिंदुस्थानचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आता ऑस्ट्रेलियाच्या ‘बिग बॅश लीग’ स्पर्धेत आपली जादू दाखवताना दिसू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग हे सध्या अश्विनच्या संपका&त असून अश्विनसारख्या दर्जाच्या खेळाडूच्या बीबीएलमध्ये खेळण्याबद्दल त्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. जर हा करार झाला तर बीबीएलमध्ये खेळणारा अश्विन हा पहिला हिंदुस्थानी क्रिकेटपटू असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अश्विनने गेल्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमधूनदेखील निवृत्ती जाहीर केली होती. शरीर साथ देत नसल्याने तसेच आयपीएलचे तीन महिने थकवणारे असल्याने आपण आता आयपीएलमध्ये खेळू शकत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. आयपीएलमधील निवृत्तीनंतर परदेशी क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचा अश्विनचा मार्ग मोकळा झाला आहे.