दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला, उरलेला आपल्या हस्तकांनी लुटावा म्हणून प्रशासनावर दबाव आणताहेत! – संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवर केलेली दमबाजी आहे. अजित पवारांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला असून उरलेला आपल्या हस्तकांनी लुटावा म्हणून प्रशासनावर दबाव आणताहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे जी माणसं आहेत ही सगळे चोर, डाकू, स्मगलर, खूनी, बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी यांना सत्ता हवी आहे. सुनील शेळके यांचे बेकायदेशीर खाणकामाचे प्रकरणी मी बाहेर काढले. त्यांनी सरकारला कोट्यवधींचा चुना लावला असून अजित पवार त्यांना संरक्षण देत आहेत, असा आरोप राऊत यांनी केले.

ईडी, सीबीआयवाले असंख्य लोक यांनी गोळा केलेले आहेत. अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. आता तेच एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देत आहेत. मी बेशिस्त खपवून घेणार नाही म्हणता, मग आता हे काय आहे? आपल्या पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याला अशा प्रकारे दम देता. अजित पवार तुमची शिस्त कुठे गेली? असा सवालराऊत यांनी केला.

ठाकरे बंधुंच्या घट्ट युतीतून मुंबईवर भगवा फडकेल आणि मराठी महापौर होईल! संजय राऊत यांचा ठाम विश्वास

बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणे म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणे. अजित पवार अर्थमंत्री असून हे प्रकरण समोर आल्यावर त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार उरत नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अनेकांना राजीनामे द्यावा लागले आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या सांगताहेत. तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहे. महाराष्ट्र राज्य चोरांचे राज्य केले आहे. वोट चोरी आलीच, पण तुम्ही महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला भ्रष्टाचाराची कीड लावत आहात. यांना लाज वाटली पाहिजे, अशी उघडपणे फोन करायला. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. आता उरलेला त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावर दबाव आणत आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.

इतनी डेअरिंग… डायरेक्ट अ‍ॅक्शन लुंगा, अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी!

जाता जाता मणिपूरला जाताहेत

दरम्यान, पंतप्रधान मोदी मणिपूरला जाणार आहेत. यावरही राऊत यांनी टीका केली. मणिपूर धगधगत असताना मोदी तिथे जायला घाबरत होते. हे अत्यंत डरपोक गृहस्थ आहेत. मणिपूरमधील हिंसेचा चटका आपल्याला बसेल. आपल्याला कुणी काहीतरी फेकून मारेल, या भीतीने त्यांची गाळण उडाली. आता जाताहेत कारण त्यांची स्वत:ची जाण्याची वेळ जवळ आली आहे. ते जाता जाता मणिपूरला जात आहेत याची इतिहासात नोंद राहील, असे राऊत म्हणाले.

दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर मोदी जाणार, दौऱ्यापूर्वी मुख्य सचिवांनी घेतल्या दोन बैठका; मदत शिबिरांना भेटी देणार