रोहित शर्मा 2027, 2031 आणि 2035 चा वर्ल्डकपही खेळणार? CSK च्या स्टार गोलंदाजानं केली पुढील 10 वर्ष खेळण्याची मागणी

रोहित शर्मा याने हिंदुस्थानला टी-20 वर्ल्डकप जिंकून दिला आणि त्यानंतर निवृत्ती घेतली. टी-20 नंतर त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम केला. आता त्याने तो फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहे. आशिया कपमध्ये तो हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसेल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वन डे मालिकेनंतर निवृत्ती घेईल अशी शक्यता आहे. मात्र त्याने आगामी दहा वर्ष क्रिकेट खेळावे अशी इच्छा चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद याने व्यक्त केली आहे.

रोहित शर्मा याने नुकतीच बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेद अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट दिली. त्यानंतर त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. रोहितला 2027 चा वन डे वर्ल्डकप हिंदुस्थानला जिंकून द्यायचा आहे. मात्र त्याने आणि विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर खेळू नये असे वाटते. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. रोहित शर्माने पुढील 10 वर्ष निवृत्ती घेऊ नये, कारण त्याच्यासारखे खेळाडू खूप कमी आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये काही घडायचे असेल तर त्याने 10 वर्ष निवृत्ती घेऊ नये, असे खलील अहमद म्हणाला.

खराब कामगिरीनंतरही रोहित शर्मा संघातील खेळाडूंशी संवाद साधतो. हेच वैशिष्ट्य त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. 2019 मध्ये राजकोटमध्ये बांगलादेशविरुद्ध सामना होता. त्या लढतीत माझी कामगिरी काही खास नव्हती. 30-35 धावा देऊन मी एकच विकेट घेतली होती. पण सामना संपल्यानंतर रोहित माझ्या रुममध्ये आला आणि माझ्याशी चर्चा केली. त्यावेळी ड्रेसिंग रुम रिकामे झालेले, सर्व निघून गेलेले. बाहेर चाहत्यांचा आरडाओरडा सुरू होता. खलील हे सगळे तुझ्यासाठीही व्हायला हवे, असे रोहित मला बाहेर येताना म्हणाला.

संघव्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रो-को नकोत