
मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसींचे नुकसान होणार नाही हा सरकारचा दावाच खोटा आहे, अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज महायुती सरकारला घरचा आहेर दिला. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरविरोधात ओबीसी समाज याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही भुजबळ यांनी दिला.
मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरू शकते. ओबीसी समाजाला काहीच त्रास होणार नाही असे सरकार म्हणत असले तरी दुसरीकडे तीन कोटी मराठा ताबडतोब ओबीसी झाले असाही दावा केला जात आहे. ते खरे असेल तर ओबीसींना त्रास होणार नाही हा दावा खोटा आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.