डायबेटीजच्या रुग्णांसाठी ‘हे’ दाणे संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, अनेकजण लहान वयात पोटाच्या समस्या, साखर, लठ्ठपणा आणि त्वचेच्या समस्यांना तोंड देत आहेत. अशावेळी औषधांचा सुद्धा उपयोग होत नाही. शेवटी आयुर्वेदाचाचे उपाय करणे हाच आधार कायम राहतो. काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांकडे परतणे हा देखील एक पर्याय आहे. रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेल्या या पदार्थाचे पाणी पिणे खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे असा दावा केला जातो. चला सविस्तरपणे जाणून घेऊया.

शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना आहे ‘ही’ डाळ, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे शरीराला आतून मजबूती मिळते. तसेच रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथीपासून तयार केलेले पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी टॉनिक म्हणून प्यायले तर अनेक आजार बरे होऊ शकतात.

मेथी दाण्याचे पाणी आम्लता आणि पोट फुगणे यासारख्या अनेक समस्यांपासून आराम देते. ते आतडे स्वच्छ करण्यात देखील प्रभावी आहे. त्यात असलेले सॅपोनिन कंपाऊंड खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

मेथीच्या बियांमध्ये नैसर्गिक घटक असतात, जे रक्तातील साखर शोषण्याची प्रक्रिया मंदावतात, म्हणजेच ते साखरेच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

मेथीचे पाणी चयापचय गतिमान करून शरीरातील चरबी कमी करते. त्यात विरघळणारे फायबर असते, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि अनावश्यक भूक लागत नाही.

मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. त्वचेला मुरुम आणि सुरकुत्यापासून वाचवतात. ते केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर आहे आणि त्यांना मजबूत आणि चमकदार बनवते. मेथीचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे.

तुमच्या किचनमधील ‘या’ गोष्टी तुम्ही कचऱ्यात टाकत असाल तर आजच हे थांबवा, वाचा

मेथी दाण्याचे पाणी कसे तयार करावे?
रात्री एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी, पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चवीसाठी त्यात लिंबू किंवा मध देखील घालू शकता. हा सोपा उपाय आरोग्यासाठी वरदान आहे. परंतु जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल किंवा कोणतेही विशेष औषध घेत असाल तर आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय ते सेवन करू नका.