
मराठा आरक्षणाला विरोध करण्याची सवयच छगन भुजबळ यांना जडली आहे. भुजबळांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना नेपाळ, नागालँडमध्ये नेऊन सोडा, असा जोरदार पलटवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अगोदर आरक्षण मिळण्यासाठी लढावे लागले, आता आरक्षण वाचवण्यासाठी बलिदान द्यावे लागत आहे असे म्हटले. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी टीकेची झोड उठवली. ओबीसींच्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केले आहे. भुजबळ विसरभोळे झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना नेपाळ, नागालँडमध्ये नेऊन सोडा, असा पलटवारही त्यांनी केला. मराठा समाजाला त्याच्या हक्काचे आरक्षण मिळाले आहे. गोरगरीब ओबीसींनीही हे समजून घ्यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.