अंबादास दानवे यांची बीड व धाराशीव जिल्ह्याच्या संपर्कनेते पदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते अंबादास दानवे यांची बीड व धाराशीव जिल्ह्याच्या संपर्कनेते पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

गुजरात राज्याच्या सहसंपर्कप्रमुख पदी केतन रेवाशंकर त्रिवेदी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने केतन रेवाशंकर त्रिवेदी यांची गुजरात राज्याच्या सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.