
मुंबईहून अमरावतीला गेलेले विमान अमरावती विमानतळावर न उतरताच मुंबईला माघारी परतले. विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खराब हवामानामुळे अडथळा निर्माण झाला. यामुळे विमानाला मुंबईला परतावे लागले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याने विमान अमरावती विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान पुन्हा मुंबईकडे माघारी वळवावे लागले. विमानाच्या परतीच्या प्रवासामुळे मुंबईहून अमरातीला येणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मुंबईला यावे लागले. तर अमरावतीहून मुंबईला जाणारी प्रवासी अमरावती विमानतळावर अडकले. हवामानातील बदल आणि तांत्रिक सुविधांचा अभाव यामुळे अमरावती-मुंबई-अमरावती या हवाई सेवेला वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे.