
माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबीन उथप्पा यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ऑनलाईन बेटिंग ऍप एक्सबेटचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली त्यांची सखोल चौकशी होणार आहे.
याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला देखील आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु ती हजर झाली नाही. रॉबीन उथप्पाला 22 सप्टेंबर रोजी तर युवराज सिंगला 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला 24 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.