
मिरजोळे एमआयडीसीत छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दापाश केला.ज्या प्लॉटवर हा वेश्याव्यवसाय सुरू होता त्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुनीलकुमार असे त्या प्लॉटमालकाचे नाव असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच संशयित नेपाळी महिलेच्या पोलीस कोठडीची मुदतही शनिवारी संपल्याने तिला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले असता तिच्याही पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
एमआयडीसी येथील ई-69 हा प्लॉट सुनिलकुमारने 1991 मध्ये औद्योगिक वापरासाठी खरेदी केला होता. या प्लॉटवर सदर नेपाळी महिला ही गेल्या 4 महिन्यांपासून वास्तवाला होती. तर पुणे येथील दोन महिला गेल्या 15 दिवसांपासून तिथे राहायला आल्या होत्या. त्या दोघींकडून नेपाळी महिला देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होती. या दोन महिलांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता केली. तर नेपाळी महिला आणि प्लॉट मालक पोलिस कोठडीत आहेत.