
मल्याळम चित्रपटसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मोहनलाल यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल या महान अभिनेता, निर्माता, दिग्दर्शकाचा सन्मान केला जात आहे. मोहनलाल यांचा चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सोशल मीडियावरून सुपरस्टार मोहनलाल यांचे अभिनंदन केले आहे.