बॉम्बशोध पथकाकडून शनिचौथऱ्याची तपासणी

 

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी येणाऱया भाविकांच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेता, आज बॉम्बशोध पथकाकडून शनिमंदिर चौथऱयाची तपासणी करण्यात आली. चौथऱयावर पोलिसांकडून बॉम्बशोधक यंत्र, डॉग स्क्वॉडमार्फत शनिमूर्तीला अर्पण करण्यात येणारी पानफुले तसेच विविध वस्तूंची तपासणी करण्यात आली.

शनिशिंगणापुरात वाढती गर्दी तसेच दर शनिवारी किमान एक लाखांवर भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा येथे कार्यरत असली, तरी अहिल्यानगर बॉम्बशोध पथकाकडून नियमित मंदिर व चौथऱयाची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती तपास करणाऱया पोलिसांनी दिली. बॉम्बशोध पथकातील हेडकॉन्स्टेबल पळसकर, कॉन्स्टेबल येठेकर, पठारे, सगळगिळे, वर्पे यांच्या पथकाने मंदिर, महाद्वार परिसराची तपासणी केली.