
जीएसटी दरात करण्यात आलेली कपात उद्या, 22 सप्टेंबरपासून देशभरात लागू होणार आहे. त्याचा परिणाम तात्काळ किमतींवर होणार असून एसी, साबण, तूप, पनीर यासारख्या दैनंदिन वापरांच्या वस्तूंसह कार, टीव्हीही स्वस्त होणार आहेत. इतकेच नव्हे तर दुकानांतील जुना साठाही स्वस्त दरात मिळणार आहे.
विरोधी पक्षांच्या सातत्याच्या मागणीनंतर पेंद्र सरकारने अलीकडेच जीएसटी दरांत सुधारणा केली. जीएसटीच्या आधीच्या रचनेत 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे चार स्लॅब होते. त्यातील 12 आणि 28 टक्क्यांचे स्लॅब काढून टाकण्यात आले आहेत. तसेच तंबाखूजन्य, ऐषारामी वस्तू व हायटेक गाडय़ांसाठी 40 टक्क्यांचा विशेष जीएसटी लावण्यात आला आहे. या बदलांमुळे 12 आणि 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये असलेल्या वस्तू आता 5 आणि 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आल्या आहेत. तर, काही वस्तू व सेवांवरील जीएसटी थेट शून्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर काही वस्तू व सेवा महाग होणार आहेत.
स्वस्त होणार
आटवलेले दूध, तूप, पनीर, चीज, सर्व, प्रकारच्या वैयक्तिक विमा पॉलिसी, कोको असलेले चॉकलेट, खजूर (मऊ किंवा कडक), अंजीर, अननस, एवोकॅडो, पेरू, आंबे (कापलेले, वाळलेले आंबे वगळता) एसी, टीव्ही, तेंदू पत्ता, पेन्सिल, शार्पनर, वही, आलेखवही, खोडरबर, काथा, मांस, जतन केलेले मांस, फ्लेवर टाकलेली रिफाइन्ड साखर, शुगर क्यूब्स, पास्ता, स्पॅगेटी, नूडल्स, कॉर्न फ्लेक्स, पेस्ट्री, केक, बिस्किटे आणि इतर बेकरी उत्पादने, कम्युनियन वेफर्स, सीलिंग वेफर्स, राईस पेपर आणि तत्सम उत्पादने, पिझ्झा ब्रेड, खाखरा, चपाती, भाकरी, भाज्या, फळे, काजू, मशरूम, आईस्क्रीम, पराठा, नमकीन, भुजिया, 20 लिटरपर्यंतचे बाटलीबंद पाणी, बिडी, टॅल्कम पावडर, फेस पावडर, केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथपावडर, शेविंग क्रीम, शेविंग लोशन, स्कूटर्स
महाग होणार
पानमसाला, नॉन अल्कोहोलिक पेये, साखर व गॅस असलेली उत्पादने, कॅफिनयुक्त पेये, कार्बोनेटेड पेये किंवा कर्बयुक्त फ्रूट ज्यूस, तंबाखू किंवा प्रक्रिया केलेल तंबाखूजन्य पदार्थ, सिगार, चेरूट्स, सिगारिलो आणि सिगारेट, 2500 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे कपडे आणि कपडय़ांच्या अॅक्सेसरीज