
कार्यालयात शिरलेल्या दोघांनी व्यावसायिकाचा खून करून पळ काढल्याची घटना चारकोप येथे घडली. मोहम्मद अयुब सय्यद असे मृताचे नाव आहे. चारकोप पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हल्ल्याच्या तासभर अगोदर हल्लेखोर हे सय्यद यांच्या कार्यालयात आले. हल्लेखोरांनी गप्पादेखील मारल्या. संधी मिळताच हल्लेखोरांनी सय्यद यांच्यावर हल्ला करून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मूळचे उत्तर प्रदेशचे सय्यद मालाड येथे राहायचे. घटनेची माहिती समजताच परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त संदीप जाधव, नीता पाडवी, विनायक चौहान हे घटनास्थळी गेले. हल्ल्याचा हेतू स्पष्ट झाला नाही.