बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शौर्य म्हापणकरला सुवर्णपदक

मालदीव येथे नुकत्याच झालेल्या मालदीव ज्युनियर ओपन 2025 या 17 वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटातील बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शौर्य म्हापणकरने शानदार खेळ करत सुवर्णपदक जिंकले. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. मालदीवच्या माले राजधानीत 1 ते 6 सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या धिरागू मालदीव ज्युनिअर ओपन गटात तब्बल 8 देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करून शौर्य आणि अन्यय देशमुख या जोडीने विजय मिळवला.