बोगस डिग्रीप्रकरणी पाकिस्तानच्या माजी खासदाराला 7 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचे माजी सदस्य जमशेद दस्ती यांना बनावट पदवी प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानातील मुलतान न्यायालयाने हा निकाल दिला.

दस्ती हे मुझफ्फरगढ येथून निवडून आले होते. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी बनावट शिक्षण प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होता. सर्व पुरावे तपासल्यानंतर आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.

हे राजकीय कारस्थान!

‘राजकीय सूडबुद्धीने माझ्याविरुद्ध कारस्थान रचण्यात आलेले आहे. निवडणुकीच्या मैदानातून मला बाहेर काढणे हा हेतू यामागे आहे,’ असा आरोप दस्ती यांनी केला आहे.

n हे वृत्त सोशल मीडियात व्हायरल झाले असून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘पाकिस्तानात बोगस डिग्रीसाठी नेत्यांना शिक्षा होते आणि आमच्याकडे असे नेते मंत्री पंतप्रधान बनतात,’ असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.