चौथीच्या विद्यार्थिनीसोबत केले अश्लील चाळे, निळजे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चोपले

पहिलीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या निळजे जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. महेंद्र खैरनार (४७) असे या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव असून इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीबरोबर त्याने हे घृणास्पद कृत्य केले आहे.

निळजे जिल्हा परिषद शाळा इयत्ता १ लीने वाचयत दुराका साधता तीन पुरुष शिक्षक आणि दोन महिला शिक्षिका कार्यरत आहेत. प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार यांनी इयत्ता पहिलीतील एका लहान मुलीशी अश्लील वर्तन केले. या त्रासामुळे पीडित बालिकेने आपल्याबरोबर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या आई-वडिलांनी ही बाब गावातील प्रतिष्ठि त नागरिक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख अॅड. मुकेश भोईर यांना सांगितली. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी खैरनारला चोप दिला आणि मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.