साडेसोळा लाखांचे ब्राऊन शुगर जप्त

ब्राऊन शुगरची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. शादाब अली सत्तार अहमद आणि अबिद बाबू अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी साडेसोळा लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. जोगेश्वरीत एक जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्या दोघांकडून पोलिसांनी 66.48 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केले. पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली. ते दोघे मूळचे उत्तराखंडचे रहिवासी आहेत. त्यांनी ते ब्राऊन शुगर उत्तराखंड येथून मुंबईत आणली. ब्राऊन शुगर तस्करीप्रकरणी त्या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.