तांबे, पितळेची भांडी काळवंडलीय का? हे करून पहा

तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करणे हे घरातील स्त्रियांसाठी मोठे जिकिरीचे काम असते. ही भांडी व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर चांगल्या प्रकारे चकाकतात. यासाठी काही घरगुती टिप्स आहेत. सर्वात आधी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांडय़ांवरील काळपट भागांवर लावा आणि काही मिनिटे राहू द्या.

ही भांडी हळुवारपणे घासून घ्या. भांडी स्वच्छ पाण्याने धुवा आणि मऊ कापडाने लगेच कोरडी करा, जेणेकरून त्यावर पाण्याचे डाग राहणार नाहीत. दोन भाग टोमॅटो पेस्टमध्ये एक भाग मीठ मिसळून घ्या. हे मिश्रण भांडय़ावर लावा आणि काही मिनिटे राहू द्या. मऊ कापडाने घासून घ्या आणि स्वच्छ धुवा. स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने पुसून घ्या.