
नवरात्रीच्या दिवसात बंगालमध्ये ‘माँ महाकाली’चे शक्ती पंचायतनाचे भव्यदर्शन पुणेकरांना होत आहे. बंगाली शैलीतील खास सजावट, फुलांची सजावट, बंगाली धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…अशा आनंदमय वातावरणात सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शारदीय दुर्गा पूजा 2025 महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. याप्रसंगी पारंपरिक बंगाली वेशभूषा करून भक्तांनी दुर्गादेवीसमोर केले जाणारे धूनुची हे भक्तिमय नृत्य सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास, सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू, विश्वस्त श्रेया भनोट, उपाध्यक्ष जॉयदीप चॅटर्जी यांनी सादर केले.
फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे


























































