घायवळसह कुटुंबीयांची 10 बँकखाती गोठवली, पुणे पोलिसांचा आणखी एक दणका

पुणे शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासह त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. बँक खात्यात 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱया टोळ्यांचे आर्थिक स्रोत बंद करून त्यांना वठणीवर आणण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे.

पुणे पोलिसांनी विविध बँक प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांतील 10 जणांची बँकखाती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित बँक प्रशासनाने नीलेश घायवळ, शुभांगी घायकळ, स्काती नीलेश घायकळ, कुसुम घायकळ, पृथ्कीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठवली आहेत. 10 बँक खात्यांतील 38 लाख 26 हजार रुपये प्रीज करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एनओसीशिवाय आता संबंधितांना खात्यातील रक्कम काढता येणार नसून, कोणत्याही बँकेचा आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी आता घायवळसोबत विविध गुह्यांत असलेल्या आरोपींची धरपकड सुरू केली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. मात्र, घायवळचे बहुतांश नंबरकारी (गंभीर गुह्यातील सहभागी आरोपी) घर बंद करून पसार झाले आहेत.

‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’

कुख्यात नीलेश घायवळ याने स्वतŠच्या आडनावात फेरफार करून पासपोर्ट मिळवल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पासपोर्टसाठी वापरले आहे. त्याला पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणाऱया प्रत्येकाची कुंडली पुणे पोलिसांकडून तपासली जात आहे.