ट्रेंड – अमेरिका सोडताना हिंदुस्थानी तरुणी भावुक

अनन्या जोशी ही हिंदुस्थानी तरुणी नोकरी न मिळाल्याने आता अमेरिका सोडून मायदेशी परतली आहे. अमेरिकेतून निघतानाचा व्हिडीओ तिने 29 सप्टेंबर रोजी शेअर केला. या व्हिडीओत तिने अमेरिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा देश सोडणे हा तिच्या प्रवासातील सर्वात कठीण टप्पा आहे, असे अनन्याने म्हटले. ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यावर अमेरिका हे माझे पहिले घर होते आणि ते माझ्यासाठी नेहमीच खास राहील. अमेरिकेने मला दिलेल्या आयुष्याची मी खरोखर कदर करते. अमेरिका, आय लव्ह यू!’ असे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अनन्याने गेल्या वर्षी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. अलीकडेच तिची नोकरी गेली. तिचा भावुक व्हिडीओ व्हायरल होत आहे.