
शिरूर तालुक्यातील डोंगरगण (टाकळी हाजी) फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रिकेशनचे दुकानात काम करत असलेल्या तरुणाला इंस्टाग्रामवर पाठवलेली रिक्वेस्ट का स्वीकारली नाही म्हणून चारजणांच्या टोळीने लाकडी दांडक्याने हल्ला करून जबर मारहाण केली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहन मळीभाऊ खामकर (वय २१ वर्षे, रा. शिनगारवाडी म्हसे बु. ता. शिरूर) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमर मुंजाळ (रा डोंगरगण, तालुका शिरूर), हर्षद खाडे, करण चव्हाण (दोघे रा., म्हसे बु.) सचिन पवार (पत्ता माहीत नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी डोंगरगण फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रिकेशनचे काम करीत असताना चार पाच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामला पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून चिडून जाऊन शिनगारवाडी गावाजवळील म्हसे बु. येथील खांडे वस्तीवरील अमर मुंजाळ (रा. डोंगरगण) याने त्याच्यासोबत हर्षद खाडे, करण चव्हाण (दोघे रा. म्हसे बु.) व सचिन पवार (पत्ता माहीत नाही) यांनी हॉटेलमध्ये लाकडी दांडक्यांनी, हाताने व लाथाबुक्क्यांनी हातावर, तोंडावर व डोक्यात जबर मारहाण केली.
मारहाणीच्या भीतीने हॉटेल बाहेर पळून जात असताना आरोपींनी तरुणास पाठलाग करून करून जखमी केले आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे येथे चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गायकवाड तपास करीत आहे.