विसर्जनाहून परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

दुर्गा मूर्तीचे विसर्जन करून परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात गुरुवारी दसऱ्याच्या सणाला गालबोट लागले. चालकाने पुलावर ट्रॅक्टर-ट्रॉली उभी केली होती. यादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून सुमारे 20 ते 25 लोक बुडाले. घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू आहे.