
पुरुषांनी चक्क साडी नेसून गरबा खेळायचा ही गुजरातमधील अहमदाबाद येथील प्राचीन परंपरा आहे. याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. ‘अहमदाबादच्या सदू माता नी पोळमधील साडी गरबा परंपरा…!’ अशी व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे. हा विधी दरवर्षी अष्टमीच्या रात्री बारोट समुदायातील पुरुष मिळून साजरे करतात. स्थानिक कथेनुसार 200 वर्षांपूर्वी सदुबेन नावाच्या एका महिलेने एका मुघल सरदारापासून स्वतःला वाचवण्यासाठी बारोट समाजातील पुरुषांकडून मदत मागितली. जेव्हा पुरुष तिचे रक्षण करण्यात अयशस्वी झाले, तेव्हा सदुबेनने तिचे मूल गमावले. संतापलेल्या आणि दुःखी झालेल्या सदुबेनने पुरुषांना शाप दिला. या शापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि सदुबेनच्या शापाचा आदर व्यक्त करण्यासाठी बारोट समाजातील पुरुष दरवर्षी अष्टमीला या साड्या नेसतात आणि गरबा करतात.