सोलापुरात MIDC त केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी परिसरातील तुळजाई असोशिएट या केमिकल कंपनीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे आहे. ही आग इतकी भयंकर आहे की, कंपनी परिसरात स्फोटांचे एकामागून एक आवाज ऐकू येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही केमिकल कंपनी असल्याने आग पसरण्याचा धोका अधिक आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.