ट्रेंड -धाडस की वेडेपणा…

राजस्थानचा लोकप्रिय ट्रव्हल व्लॉगर शक्ती सिंह शेखावत यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. एकपहिया नावाची त्यांची नवी ट्रव्हल सीरिज सध्या चर्चेत आहे. कारण- त्यांनी मनाली ते लेह हा प्रवास गाडी किंवा बाईकवरून न करता, एकाच चाकावर चालणाऱया अनोख्या बॅलन्सिंग बोर्डवर करण्याचा निर्णय घेतला आहे. या सीरिजचा टीझर शक्ती सिंह यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला होता. त्या टीझरमध्ये त्यांनी जाहीर केले, ‘मनाली ते लेह हा प्रवास मी चार चाकी किंवा दोन चाकीवरून नाही, तर एकाच चाकावरून करणार आहे.’ हे ऐकूनच त्यांचे फॉलोअर्स थक्क झाले. या धाडसी प्रवासाची सुरुवात त्यांनी 30 सप्टेंबरपासून केली आणि ते प्रवासदर्शन ते सोशल मीडियावरून घडवीत आहेत. हे धाडस की वेडेपणा यावर सध्या नेटीजन्स चर्चा करत आहेत.