
एडटेक फर्म फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे यांनी बॉलीवूडचा किंग शाहरुख खानला मागे टाकले आहे. हुरून इंडिया रिचने नुकतीच श्रीमंत व्यक्तीची संपत्ती जाहीर केली असून यात अलख पांडे यांची संपत्ती शाहरुखच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. अलख पांडे यांची एकूण संपत्ती 14 हजार 510 कोटी रुपये इतकी आहे. तर शाहरुख खान यांची संपत्ती 12 हजार 490 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या काही वर्षात अलख पांडे यांची कंपनी फिजिक्सवाला तोटय़ात असूनही संपत्ती मात्र वाढली आहे. 2025 या आर्थिक वर्षात फिजिक्सवालाला 243 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. फिजिक्सवाला ही कंपनी जेईई, नीट, गेट आणि यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणाऱया कोर्सेसचे प्रशिक्षण देते.