
जपानच्या सत्ताधारी पक्षाने शनिवारी माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची यांची नेतेपदी निवड केली आहे. यामुळे जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ताकाइची यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी कडून केलेल्या अंतर-दलीय मतदानात कृषिमंत्री शिंजिरो कोइजुमी यांचा पराभव केला आहे. ते माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांचे पुत्र आहेत. ताकाइची या 1993 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी आर्थिक सुरक्षा, लैंगिक समानता मंत्री अशा विविध सरकारी पदांवर काम केले आहे. एक मजबूत लष्कर, सैन्याचा खर्च वाढवणे, सायबर सुरक्षा यावर त्यांचा फोकस आहे.