
बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले म्हणाले आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “बिहारमधील सरकार बदलणार आहे. बिहार बदलेल. दलित आणि आदिवासी समुदायांनी सध्याच्या सरकारला सत्तेवरून हटवण्याचा संकल्प केला आहे.”
अलिकडेच तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपनं हायजॅक केलं आहे, असा आरोप केला होता. त्यांनी असंही म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बिहार सरकार चालवत आहेत. ते म्हणाले होते की, “बिहारचे मुख्यमंत्री शुद्धीत नाहीत. त्यांना भाजपनं हायजॅक केलं आहे. प्रत्यक्षात सरकार मोदी आणि शाह या दोन लोकांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं चालवलं जात आहे.”