
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कठोर इशारा दिला आहे की, जर हमास गाझामध्ये सत्ता सोडण्यास नकार देईल आणि गाझा शांतता योजनेला मान्यता देणार नसेल, तर त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले जाईल. ट्रम्प यांनी हमासला रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (अमेरिकन वेळेनुसार) शांतता प्रस्ताव स्वीकारण्याचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे.
२० सूत्री गाझा शांतता योजना
डोनाल्ड ट्रम्प यांची ही २० सूत्री योजना आहे. यात नवीन बांधकाम, युद्धोत्तर गाझा प्रशासनाची रचना आणि तात्पुरती शासकीय समिती स्थापन करण्यासारख्या गोष्टींचा समावेश. या समितीचे अध्यक्ष ट्रम्प स्वतः असू शकतात, आणि त्यात माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांसारखे नावे समाविष्ट होऊ शकतात. योजनेत गाझामधील लोकांना जबरदस्तीने हलवू नये आणि दोन्ही बाजूंनी (इस्रायल आणि हमास) शर्ती मान्य केल्यास युद्ध तात्काळ थांबवण्याची तरतुद आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या इशाऱ्याने मध्य पूर्व भागातील तणाव वाढला आहे. यावर अद्याप हमासची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इस्रायल -हमास संघर्षात नवीन वळण येऊ शकते.