
1999 मधील कारगिल युद्धापासून अलीकडेच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत शौर्य गाजवणारे कॅप्टन भार्गव सदाशिव शिंदे यांनी हिंदुस्थानी लष्करात 33 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्ती घेतली. शिवसेनेने त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांच्या पराक्रमाला सलामी दिली.
लोअर परळमधील हजारो रहिवासी कॅप्टन भार्गव यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी यावेळी कॅप्टन शिंदे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. देशसेवा, शौर्य आणि समर्पणाबद्दल त्यांनी भार्गव यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद जामसंडेकर, लीलाधर प्रभू, श्रीकांत बाईत, पंकज सुर्वे, विनोद निकम, नितीन पवार, प्रकाश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.