हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर

हवामानातील बदलाचा केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. उष्णतेमुळे मुरुमे होतात, तर हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेचे हाल होतात. हिवाळ्यात आपण फार कमी पाणी पित असल्याने, आपली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. हवामान थंड झाल्यामुळे, आपल्या दैनंदिन दिनचर्येत कमी द्रवपदार्थ आणि पाणी कमी पितो. यामुळे आपल्या त्वचेवर कोरडेपणा येतो.

त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबजल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

निरोगी आहार आणि द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यासाठी आपण आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचेचो नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, तिला अंतर्गत आणि बाह्यरित्या पोषण देणे आवश्यक आहे. याकरता त्वचेच्या स्वच्छतेपासून ते ओलावा टिकवून ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ऑक्टोबर सुरू होताच, हवामान देखील थंड होते. म्हणून आता तुमच्या त्वचेची काळजी घेणे शहाणपणाचे आहे.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे स्वच्छता, परंतु हिवाळ्यात, हायड्रेटिंग फेस वॉश वापरण्याची सुरुवात करा. जास्त फोम किंवा जेल फेस वॉश तेल नियंत्रित करतात आणि त्वचा कोरडी करू शकतात.

तोंडीलावणीसाठी बनवा 10 मिनिटांत मसालेदार, तिखट हिरव्या मिरचीचे लोणचे

निरोगी त्वचेसाठी एक्सफोलिएटिंग आवश्यक आहे. यामुळे त्वचेच्या मृत पेशी काढूण्यास मदत होते. जास्त एक्सफोलिएशनमुळे त्वचेची जळजळ आणि ताण येऊ शकतो. आठवड्यातून एकदा किंवा दर 10 दिवसांनी स्क्रब करा आणि सौम्य एक्सफोलिएटिंग जेल वापरा.

त्वचेचे टोनिंग नेहमीच आवश्यक असते. हिवाळ्यात हायल्यूरॉनिक अॅसिड, कॅमोमाइल अर्क आणि गुलाबपाणी यासारखे घटक असलेले टोनर वापरा.

जायफळ आपल्या सौंदर्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

हिवाळ्यातील त्वचेला खोलवर मॉइश्चरायझिंग आणि पोषण देणारे मॉइश्चरायझर निवडा. यासाठी तुम्ही एरंडेल, नारळ आणि बदाम तेल यांसारखे नैसर्गिक तेल देखील वापरू शकता. सकाळी आणि रात्री त्वचेची काळजी घेण्याव्यतिरिक्त, जर तुमची त्वचा कोरडी झाली तर लगेच मॉइश्चरायझर लावा.

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दही आणि चिमूटभर हळदीपासून बनवलेला फेस पॅक लावा. या पॅकमध्ये थोडे मध देखील घालता येते, जे त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते.