एमडी विकायला आलेल्या सराईत गुन्हेगारांना बेड्या

ट्रॉम्बे परिसरातील नशेबाजांना एमडी विकण्यासाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना ट्रॉम्बे पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. दोन सराईत गुन्हेगार एमडी विकण्याच्या प्रयत्नात असल्याचे ट्रॉम्बे पोलिसांना समजले. त्यानुसार सपोनि लोंढे, उपनिरीक्षक शरद नाणेकर व पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून मोहम्मद फैज आली खान (24) आणि जाहीर जहांगीर आली शेख (35) या दोघांना अटक केली.