केसांना कलर करताना ‘या’ चुकांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर

केस हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. केसांचा रंग हा आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आणि स्टाइलवरही परिणाम करतो. म्हणूनच योग्य केसांचा रंग निवडणे महत्वाचे आहे. परिपूर्ण लूक मिळविण्यासाठी विचारात घेण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. बरेचदा लोक विचार न करता त्यांचे केस रंगवतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक खराब होतो.

जेवणात हळदीचा वापर किती प्रमाणात करावा? वाचा सविस्तर

केसांना कलर केल्यानंतर मात्र त्यांच्या चुकीबद्दल पश्चात्ताप करतात. कलर केल्यानंतर काही काळानंतर केस हे निस्तेज किंवा कोरडे दिसू लागतात. जाणून घेऊया यामागची महत्त्वाची कारणे

तुम्ही तुमचे केसांना कलर करणार असाल तर, त्वचेच्या रंगाशी जुळणारा केसांचा रंग निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.

नैसर्गिक रंगापेक्षा फक्त दोन किंवा तीन शेड्स जास्त रंग निवडावा. अगदी केसांच्या रंगापेक्षा वेगळा रंग निवडल्यास, केसांचे सर्वाधिक नुकसान होण्याचा संभव असतो.

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच ‘हे’ पेय पिण्यास सुरुवात करा, जाणून घ्या

केसांना कलर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. काहीजणांची त्वचा संवेदनशील असते. कलर सूट न झाल्यामुळे, पुरळ उठणे सारख्या समस्या उद्भवू शकतात.

तुम्ही कोणत्या ब्रँडच्या केसांचा रंग वापरत आहात हे पाहण्यासाठी सलूनशी आधीच संपर्क साधा. लावलेला रंग अमोनियामुक्त आहे याची खात्री करा. यामुळे केसांचे नुकसान टळते.

केस रंगवल्यानंतर काय लक्षात ठेवावे?

तुम्ही केस रंगवले असतील, तर एक किंवा दोन दिवस सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवणे टाळा.

केस कलर केल्यानंतर काही दिवस क्लोरीनयुक्त पाण्यापासून तुमचे केस वाचवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही पोहायला गेलात तर टोपी घाला.

शुगर वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांपासून राहा चार हात दूर, वाचा

केस रंगवल्यानंतर, सल्फेटयुक्त शाम्पू वापरू नका याची काळजी घ्या, अन्यथा रंग फिकट होऊ शकतो.

केस रंगवल्यानंतर, ब्लो ड्रायर आणि स्ट्रेटनर्स सारख्या उष्णतेच्या उपचारांचा वापर कमीत कमी ७२ तासांसाठी कमी करा.

रंगवल्यानंतर गरम पाण्याने केस धुवू नका. यामुळे रंग फिकट दिसू शकतो.