पंजाब सरकारने कोल्ड्रिफ सिरपवर घातली बंदी

तामीळनाडू, मध्य प्रदेश आणि केरळ अशा तीन राज्यांत कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता पंजाब सरकारनेही या सिरपवर बंदी घातली आहे. राज्यातील सर्व रिटेलर्स, डिस्ट्रिब्यूटर्स, रुग्णालय आणि मेडिकल यांना आदेश दिले की, या औषधाचा वापर करू नये, खरेदी किंवा विक्री करण्यात येऊ नये.