डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर, अहिल्यानगरमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर लिहिलेले कागद दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या पिशव्या उड्डाणपुलावरून इम्पिरियल चौकात फेकण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (दि. 6) सायंकाळी समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश वसंत थोरात (रा. रयत शिक्षण संस्था कार्यालयासमोर, बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रिक्षाचालक असून, ते सोमवारी सायंकाळी बुरूडगाव रोड रिक्षा स्टॉप येथे थांबलेले असताना अज्ञात व्यक्तीने उड्डाणपुलावरून दोन प्लास्टिक पिशव्या खाली फेकल्या. त्यात एका पिशवीत अंडय़ाची टरपले, तर एका पिशवीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर लिहिलेले कागद आढळून आले. ही घटना समजताच काही वेळात तेथे नागरिक जमा झाले.

या अवमानकारक मजकुरामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून, दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात समाज कंटकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी समाजकंटकाचा शोध सुरू केला असून, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

समाजकंटकाला तत्काळ अटक करा

– अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावण्यात आली. या पत्रकात शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. हा प्रकार संतापजनक असून, शहरात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समस्त आंबेडकरी समाजाने केला आहे. या संदर्भात आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात असून, आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, अतुल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

कारागृह की कोंडवाडा….

– येथील तहसील कार्यालयनजीक असलेले दुय्यम कारागृह अनेकदा चर्चेत असते. येथील कारागृहाची क्षमता केवळ 25 आरोपी ठेवण्याची असताना तेथे आज रोजी चार बराकित 70 आरोपी ठेवण्यात आले आहे.