
दीपावली सणात बाजारपेठांसह सर्वत्र विजेचे भारनियमन होऊ नये, याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबत गांधीनगर विजय वितरणचे सहायक अभियंता विजय कोठावळे यांना निवेदन देण्यात आले.
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, दीपावली सणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्ये होलसेल व रिटेल खरेदीदारांची रेलचेच सुरू आहे. अनेक दुकानेही दीपावलीच्या सणाला माल भरून तयार आहेत. रस्त्यावरही माल लावणाऱयांची संख्या मोठी असल्याने दिवसभरात कोणत्याही वेळेस भारनियमन होऊ नये. अतिरिक्त लोड असणाऱया डीपीजवळ कर्मचाऱयांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सहायक अभियंता कोठावळे यांनी कर्मचारी नियुक्त करून वीज जाणार नाही. तसेच गेल्यास तत्काळ दुरुस्ती करू, असे आश्वासन दिले.