
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता जर रेल्वेने कुठे जायच्या तुमच्या तारखेत बदल झाला तर तुम्हाला तुमच्या कन्फर्म तिकीटची तारखेत बदल करता येणार आहे. तारीख बदलण्यासाठी रेल्वेने ऑनलाईन सोय उपलब्ध केली आहे.
पूर्वी, प्रवाशांना काही कारणास्तव त्यांचा प्रवास पुढे ढकलावा लागला तर थेट तिकिटं रद्द करावी लागायची आणि नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावे लागत होते, ज्यामध्ये कॅन्सलेशन चार्जेसही लागायचे तसेच कन्फर्म सीटची कोणतीही हमी नव्हती. मात्र आता, रेल्वेच्या या नवीन बदलामुळे ही समस्या दूर होईल आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.