
वाढदिवस असला की शाळेत चॉकलेट वाटली जातात. एका पठ्ठ्याने आपला वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी इतरांसारखी चॉकलेट्स नव्हे तर पिशवीभर साखर वाटली. या बर्थ डे सेलिब्रेनशचा व्हिडीआ चांगलाच व्हायरल होतोय. ज्याचा वाढदिवस आहे, तो विद्यार्थी शिक्षकांकडे एक पिशवी आणि चमचा घेऊन जातो. या पिशवीत साखर असते. त्याची भन्नाट कल्पना पाहून शिक्षकांनीसुद्धा डोक्याला हात मारला आणि पोट धरून हसू लागले. नंतर शिक्षकांनी त्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये साखर वाटण्यास सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @get_set_viral आणि @aaj_kay_navin1010 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.