
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत भास्कर जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा समन्वयक जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर मुंबई लोकसभा समन्वयकपदी अॅड. विकास डोंगरे आणि दिनेश गुप्ता (कार्यक्षेत्र – दहिसर, कांदिवली, चारकोप विधानसभा) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
कुणबी समाजाचा आज आझाद मैदानावर मोर्चा, पोलिसांनी परवानगी नाकारली
ओबीसी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुणबी समाजाच्या वतीने उद्या (गुरुवारी) आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून राज्यभरातून समाजबांधव मोठय़ा संख्येने यात सहभागी होणार आहेत.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सुधारित परिपत्रक काढून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत कुणबी समाजाने मोर्चाची हाक दिली आहे. राज्यातील कुणबी समाजाला स्वतंत्र ओबीसी आरक्षण मिळावे, प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि शासनाने घेतलेले ताजे निर्णय मागे घ्यावेत, या मुख्य मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.