दिवाळीत या पद्धतीने करा फेशियल, चेहऱ्यावर येईल अनोखा ग्लो

येत्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटल्यावर, पाहुणे रावळे आणि इतर कामं आलीच. परंतु दिवाळीला आपणही ताजेतवाने दिसायला हवे. म्हणूनच खास या दिवाळीला अशापद्धतीने फेशियल नक्की करुन बघा. या प्रकारच्या फेशियलमुळे चेहऱ्यावर ग्लो तर येईलच. शिवाय आपल्या त्वचेचे आरोग्यही सुधारेल.

Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे? वाचा

एखाद्या सणा- समारंभासाठी तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर, स्टीम फेशियल घरी सहज आणि अगदी कमी वेळात करता येते. स्टीम फेशियल केल्याने, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासोबतच डागही दूर होतात. स्टीम फेशियल करताना पाण्यात नैसर्गिक औषधी वनस्पती मिसळल्याने बंद छिद्रांमध्ये साचलेली घाण साफ होण्यास मदत होते आणि त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांपेक्षा हे 5 पदार्थ अधिक प्रभावी आहेत, वाचा

स्टीम फेशियलसाठी काय करायला हवे?

कडुलिंबाची पाने स्टीम फेशियलमध्ये देखील वापरता येतील. कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणूविरोधी गुणधर्म आढळतात. उकळत्या पाण्यात 10 ते 12 कडुलिंबाची पाने घाला आणि उकळवा. आता या पाण्याची वाफ घेतल्याने केवळ मुरुमे कमी होत नाहीत तर डागही निघून जातात. कडुलिंबाच्या पानांची वाफ घेतल्याने त्वचा स्वच्छ होते.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी स्टीम फेशियलमध्ये लिंबाचा देखील वापर करता येतो. लिंबू त्वचेला डिटॉक्सिफाय करते आणि तेलकट त्वचेच्या समस्यांपासूनही आराम देते. याकरता उकळत्या पाण्यात 1 ते 2 लिंबाचे तुकडे घाला आणि पाणी उकळवा. यामध्ये ग्रीन टी बॅग्जसोबत पेपरमिंट ऑइल देखील घालू शकता. या पाण्याने चेहऱ्याला वाफ घेतल्याने, त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो.

नैराश्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या

बडीशेप आणि तमालपत्र जेवणाची चव वाढवतातच, शिवाय त्वचेच्या अनेक समस्याही दूर करतात. स्टीम फेशियल करताना 1 चमचा बडीशेप आणि 2 तमालपत्र मिक्सरमध्ये टाका आणि पावडर बनवा. आता ही पावडर उकळत्या पाण्यात घाला आणि पाणी उकळवा. आता गॅस बंद करा, चेहऱ्यावर टॉवेल ठेवा आणि या पाण्याची वाफ घ्या. तुम्ही त्यात गुलाबाच्या पाकळ्या देखील घालू शकता. हे फेशियल केल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते आणि कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळतो.

स्टीम फेशियलसाठी काकडीचा वापरही करता येईल. काकडीमुळे टॅनिंग कमी होईल तसेच त्वचेलाही तजेला येतो. काकडीचे 5 ते 6 तुकडे पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर या पाण्याची वाफ घ्या. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)