12 वर्षांनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

फरार असलेल्या महिलेला डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी 12 वर्षांनी बेड्या ठोकल्या. चन्ना बेगम शेख ऊर्फ रोजा असे तिचे नाव आहे. तिला अटक करून विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते.

2013 साली डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात ‘पीटा’ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात चन्ना बेगमलादेखील पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटल्यानंतर ती सुनावणीसाठी विशेष सत्र न्यायालयात सतत गैरहजर राहत होती. तिच्या विरोधात नुकतेच विशेष सत्र न्यायालयाने स्टॅण्डिंग नॉन बेलेबल वॉरंट काढले होते. तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात सांगण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक नितीन दळवी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक अजीम शेख, राजेश पालांडे, म्हात्रे, दिवटे, गवळी, राठोड आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

चन्ना ही आंध्र प्रदेश येथे एका दुकानात काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशच्या कडप्पा येथे गेले. तेथे गेल्यावर स्थानिक पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या मदतीने तिला एका कॉस्मेटिक्सच्या दुकानातून तिला अटक केली. तिला अटक करून मुंबईत आणण्यात आले. तिला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले.