
दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवत असल्याच्या संशयातून प्रियकरानेच चाकू आणि लोखंडी पानाने वार करून प्रेयसीचा निघृण खून केला. ही घटना वाकड काळाखडक येथील अॅ बिअस लॉजमध्ये शनिवारी (दि. ११) दुपारी घडली. या प्रकारानंतर आरोपी प्रियकराने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
मेरी मल्लेश तेलगू (वय २६, रा. देहूरोड) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. दिलावर आणि मेरी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, मेरी दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवत असल्याच्या दिलावर याला संशय आला होता. शनिवारी दुपारी दिलावर तिला लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने मेरीचा मोबाईल फोन पाहिला असता दुसऱ्या व्यक्तीसोबत तिचे फोटो दिसल्याने तो संतापला. त्याने सोबत आणलेल्या चाकू व लोखंडी पानाने तिच्यावर वार करून तिचा खून केला. या प्रकारानंतर दिलावर याने लॉजमधून पळ काढला. त्यानंतर तो पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गेला. तेथे त्याने घडलेला प्रकार सांगितला. कोंढवा ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तत्काळ वाकड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली