
हृदयाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. मन जिंकण्याचा हा फंडा शिकून घेण्यासाठी हल्ली यूटयूबवरच्या रेसिपी चिक्कार बघितल्या जातात. त्या पाहून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. साहजिकच रेसिपीचे असंख्य व्हिडिओ रोजच्या रोज व्हायरल होत असतात. ’व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ जसं असतं, तसंच ’व्यक्ती तितक्या रेसिपी…’ असल्याने अनेक हटके रेसिपी आपल्याला यातून कळतात. अशीच एक रेसिपी सांगणारा व्हिडिओ सध्या ट्रेंड होतोय. ही रेसिपी आहे शराबी मटणाची. दारू आणि शुद्ध तूप घालून केल्या जाणाया मटणाची आणि व्हिडिओ आहे अमृतसरच्या एका स्टॉलवरचा. शराबी मटणाची ही रेसिपी सध्या प्रचंड पाहिली जातेय. https://tinyurl.com/jzsk7w5y या लिंकवर हा व्हिडिओ पाहता येईल.