अक्षय कुमारची हायकोर्टात धाव; नाव, आवाजाला हवे संरक्षण

सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नाव, आवाज व छायाचित्राचा गैरवापर होत असून याला निर्बंध घालावेत, अशी मागणी अक्षय कुमारने केली आहे. न्या. आरीफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अभिनेत्याच्या वैयक्तिक गोष्टींचा गैरवापर केला जात आहे. हे अक्षय कुमार व त्याच्या कुटुंबासाठी धोकादायक आहे. काही स्पष्टीकरण देण्याआधीच या सर्वांचे समाजात चुकीचे पडसाद उमटतात. त्यामुळे यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी वरिष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी केली. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे.