शांत झोप लागण्यासाठी महिन्यातून एकदा हे करायलाच हवं, वाचा

आपल्या शरीराचा भार हा पायांवर येत असल्यामुळे पायांची निगा राखणे काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. पायांची निगा राखण्याचा एकमेव उत्तम पर्याय म्हणजे पेडीक्योर करणे. पेडीक्योर करण्यासाठी महिन्यातून किमान एखादा दिवस काढायलाच हवा. त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूपच फायदा मिळतो.

सौंदर्याची व्याख्या ही आपल्या शरीराच्या कुठल्याही एका भागासाठी महत्त्वाची नाही. तर आपल्याला शरीराच्या प्रत्येक भागाच्या सौंदर्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण फेशियल, वॅक्सिंग महिन्याला जाऊन करतो. परंतु पायांच्या सौंदर्याकडे आजही आपण दुर्लक्ष करतो. पायांचे सौंदर्य केवळ दिसण्यापुरते मर्यादीत नाही, तर पायांची उत्तम निगा राखल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे.

 

दररोज आवळा आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

पेडीक्योरमुळे पायांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. पायाच्या त्वचेवरील मृत पेशी निघून गेल्यामुळे पायही सुंदर दिसू लागतात.

पेडीक्योरमुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो.

पेडीक्योर करताना पायांची मालिश केली जाते, त्यामुळे आपले संपूर्ण शरीर रिलॅक्स होते.

पायांचे अनेक पाॅईंटस् मसाज करताना दाबले जातात, यामुळे पाठदुखी कमी होण्यासही मदत होते.

शरीरामध्ये उत्तम रक्तपुरवठा होण्यास मदत होते, तसेच आपल्या त्वचेवरही चकाकी येते.

मलेरिया होऊन गेल्यानंतर आहारात काय बदल करणे गरजेचे आहे, वाचा

नखांमधील घाण धूळ पेडीक्योर करताना स्वच्छ होते त्यामुळे संसर्ग रोखण्यास खूप मदत होते.

पेडीक्योर केल्यामुळे, शांत झोप लागण्यासही मदत होते.

पेडीक्योरमध्ये नखांची उत्तम काळजी घेतली जाते, तशीच नखांची स्वच्छता केल्यामुळे नखांची चमक वाढते आणि नखांचे आरोग्य सुधारते.

पेडीक्योरमुळे भेगा पडलेल्या टाचांनाही आराम मिळतो, त्यामुळे टाचांचे सौंदर्य वाढते.