बोलिवियात राष्ट्रपती निवडणुकीत रोड्रिगो यांची बाजी

बोलिवियामध्ये राष्ट्रपती निवडणुकीत रोड्रिगो पाज यांनी बाजी मारली आहे. त्यांना सर्वाधिक 54 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यांनी माजी राष्ट्रपती जॉर्ज तुतो कीरोगा यांचा पराभव केला आहे. रोड्रिगो पाज यांना 54 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत, तर जॉर्ज तुतो कीरोगा यांना केवळ 45 टक्के मते मिळाली आहेत. जॉर्ज तुतो कीरोगा यांच्या सरकारवर आवश्यकतेहून अधिक खर्च करण्याचा आणि देशाला आर्थिक संकटात ढकलण्याचा आरोप आहे. सध्या देशात डॉलरची कमी आहे. महागाई दर 23 टक्क्यांवर पोहोचला आहे.